Home » Akola : खासदार गवळींनी दिला हिशोब ; १९ कोटी गैरव्यवहार प्रकरण

Akola : खासदार गवळींनी दिला हिशोब ; १९ कोटी गैरव्यवहार प्रकरण

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या नावे आयकर विभागाने नोटीस बजावली होती. भावना गवळी यांना आज अकोला येथील आयकर विभागात स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. भावना गवळी यांना २६ कोटी रुपयाच्या रोख रकमेचा हिशोब मागविण्यात आला होता. शुक्रवार, ५ जानेवारीपर्यंत नोटिसला उत्तर देण्याची मुदत खासदार भावना गवळी यांना देण्यात आली होती. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेत १९ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत याप्रकरणी आयकर कायद्याच्या कलम 131 (1A) कलमानुसार २९ डिसेंबर २०२३ रोजी गवळी यांना नोटीस बजावण्यात आली होती. (MP Gawli gave the account; 19 crore misappropriation case)

भावना गवळी यांच्या प्रतिनिधींनी अकोला येथील आयकर विभागाच्या कार्यालयात मागविण्यात आलेले सर्व कागदपत्र दाखल केले आहेत. नेमके कोणते स्पष्टीकरण आणि कागदपत्र गवळी यांच्यावतीने दाखल करण्यात आलीत याबद्दल त्यांच्या प्रतिनिधी किंवा आयकर विभाग अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या नावे आयकर विभागाने नोटीस बजावली होती. भावना गवळी यांना आज अकोला येथील आयकर विभागात स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. भावना गवळी यांना २६ कोटी रुपयाच्या रोख रकमेचा हिशोब मागविण्यात आला होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!