Home » इतिहासात प्रथमच संघाच्या विजयादशी उत्सवाच्या मंचावर येणार महिला अतिथी

इतिहासात प्रथमच संघाच्या विजयादशी उत्सवाच्या मंचावर येणार महिला अतिथी

by नवस्वराज
0 comment

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात यंदा प्रथमच एका महिलेला प्रमुख अतिथीचे स्थान देण्यात आले आहे. बुधवार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमाला प्रसिद्ध गिर्यारोहक पद्मश्री संतोष यादव उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व्यासपीठावर उपस्थित राहतील.

संघाच्या परंपरेप्रमाणे बुधवारी सकाळी ७.४० वाजता विजयादशमी उत्सवाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमादरम्यान स्वयंसेवक कवायती सादर करतील. त्यानंतर श्रीमती यादव आणि सरसंघचालक डॉ. भागवत उपस्थितांना संबोधित करतील. संघ परंपरेत विजयादशी उत्सवाला मोठे महत्व आहे. आतापर्यंत अनेक नामांकित अतिथींनी संघाच्या या उत्सवाला उपस्थिती नोंदविली आहे. मात्र संघाच्या इतिहासात प्रथमच महिला अतिथी विजयादशमी उत्सवाच्या व्यासपीठावर येणार आहे. त्यामुळे नव्या आधुनिक भारताची आगळीवेगळी सुरुवात संघ करणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी विजयादशमी उत्सवात महिला अतिथींना निमंत्रित करण्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर तत्काळ सकारात्मक विचार करून यादव यांना निमंत्रित करण्यात आले.

दोनदा मोहिम यशस्वी करणारी एकमेव महिला

गिर्यारोहणाच्या क्षेत्रात पुरूषांनाही मागे सोडणाऱ्या संतोष यादव मूळच्या हरीयाणाच्या रेवाडी तालुक्यातील जोनीयावास गावातील आहेत. आता ५४ वर्षीय असलेल्या यादव या जगातील अशा एकमेव महिला आहेत, ज्यांनी दोनदा माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे. ८ हजार ८४८ मीटर चढाई त्यांनी केली आहे. जयपूर येथील यादव यांनी कॉलेज शिक्षण घेतले. १९९२ मध्ये त्यांनी प्रथम माऊंट एव्हरेस्ट सर केले. त्यानंतर पुन्हा १९९३मध्ये ही मोहिम फत्ते केली. भारत-तिबेट सीमा पोलिसांत असलेल्या यादव यांना २००० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!