Mumbai | मुंबई : भारतावरील अनेक अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याची माहिती पसरली होती. आता पाकिस्तानी समाज माध्यमावर पोस्ट व्हायरस झाली आहे, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, जैश-ए-मोहम्मदचा मसूद अजहर हा भावलपूर येथील मशिदीतून परतताना सोमवारी सकाळी पाच वाजताचे सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या बॉम्बस्फोटात ठार झाला. (Most Wanted Terrorist Jaish-E-Muhammad Chief Masud Ajhar Killed In Bomb Blast)
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर असा दावा करण्यात येत आहे की, 2001 मधील भारताच्या संसदेवरील हल्ला, 2005 मधील अयोध्या राम जन्मभूमिवरील तसेच 2019 फेब्रुवारीमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तसेच जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी केलेल्या बॉम्ब स्फोटात मारल्या गेला. मात्र त्याच्या मृत्युबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मसूद अजहर पाकिस्तानच्या इस्लामाबाद डिप स्टेटच्या सुरक्षेत होता.