Home » मोदी, शहांच्या विरोधात गेले तर गडकरींवरही कारवाई : कन्हय्या

मोदी, शहांच्या विरोधात गेले तर गडकरींवरही कारवाई : कन्हय्या

by नवस्वराज
0 comment

नागपूर : ‘केंद्रीय राजकारणात सध्या भाजप आणि त्यातही मोदी, शहा यांच्याकडे सध्या अमर्यादित सत्ताबळ आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाणाऱ्या कोणालाही ते संपवून टाकतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कितीही बाहुबली नेते असले तरी ते मोदी शहांच्या विरोधात गेले, तर त्यांनाही सीबीआय, ईडीसारख्यांच्या कारवाईला तोंड द्यावे लागू शकते’, असे विधान काँग्रेसचे नेते कन्हय्या कुमार यांनी केले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी तंत्रज्ञान यात्रेचे नागपुरात आयोजन केले होते. यात्रेत सहभागी होण्यासाठी नागपुरात आल्यानंतर कन्हय्या यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय तपास आणि सुरक्षा यंत्रणांचा मोदी, शहा कसा गैरवापर करीत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘युवा है जोश में, लायेंगे इन्हे होश में’ या रॅलीच्या माध्यमातून देशाला विकणाऱ्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याचे काम केले जात आहे.  देशासमोर बेरोजगारी, महागाईचे आव्हान आहे, शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत. हे सर्व थांबवायचे आहे. त्यासाठी लोकांना एकत्रित करण्याकरिता ही रॅली काढण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!