मुंबई : राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात आपला आमदार मतदान करेल, असे नमूद करीत भाजपला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर भाजपने सरकारला कोंडीत पकडण्याचे सर्व डावपेच सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली.
राज यांनी विधान सभेतील मनसे आमदार सरकारच्या विरोधात मतदान करेल असे स्पष्ट केले. विधान सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच आमदार आहे. मनसेजवळ संख्याबळ नसले तरी सरकार टिकविण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीला एक एक मत महत्वाचे आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना कोरोनाची लागण झाल्याने सरकारपुढील अडचणी आणखी गडद झाल्या आहेत.