Home » राज ठाकरे म्हणाले, आधी नाश्ता कर तरच सही देईल

राज ठाकरे म्हणाले, आधी नाश्ता कर तरच सही देईल

by नवस्वराज
0 comment

नागपूर : महाराष्ट्र नवनिमर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे असेच आगळेवेगळे स्वरूप रविवार, 18 सप्टेंबर 2022 रोजी नागपुरात दिसले. ठाकरे पाच दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अशात पहिल्याच दिवशी त्यांच्या संवेदनशील मनाचाही प्रत्यय कार्यकर्त्यांना आला.

अद्वैत पत्की नावाचा अवघ्या दहा वर्षाचा एक मुलगा राज ठाकरे यांना भेटायचे आहे, असा हट्ट करून आपल्या आजीला घेऊन राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलसमोर सकाळपासून थांबला होता. पहाटेपासून तो आजीसह उपाशी उभा होता. याबाबत माहिती मिळताच ठाकरे यांनी त्याला व त्याच्या आजीला बोलावून घेतले. या मुलाने राज यांना सही (ऑटोग्राफ) मागितला. ‘तू आणि तुझी आजी सकाळपासून उपाशी आहे. तू आधी नाश्ता करशील तरच मी सही देईल’, असे राज अद्वैतला म्हणाले.

चिमुकल्याने नाष्टा केला आणि त्यानंतर अकरा वाजून पाच मिनिटाला जेव्हा राज ठाकरे हॉटेलमधून रवी भवनला जाण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा सर्वात पहिले त्यांनी लिफ्ट मधून बाहेर पडल्यावर अद्वैची भेट घेतली. त्याने सोबत आणलेल्या डायरीवर त्याला ऑटोग्राफ दिला आणि शुभेच्छा देत राज ठाकरे रवीभवनकडे निघाले.

कोपऱ्यात उभा होता चिमुकला

राज यांना आजीसह भेटायला आलेला अद्वैत पत्की हॉटेलजवळ एका कोपऱ्यात उभा होता. राज ठाकरे जेव्हा साडेनऊच्या सुमारास हॉटेलमध्ये दाखल झाले. नागपुरातील काही कार्यकर्त्यांना हा चिमुकला कोपऱ्यात उभा दिसला. त्याला रवी भवन येथे जाऊन राज ठाकरे यांची दुपारी भेट घे, असा सल्ला देण्यात आला. मात्र चिमुकला आणि त्याची आजी गेले नाही. ही बाब कळल्यावर अखेरीस त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला.

‘दहा वर्षांचा एक मुलगा आपल्याला भेटू इच्छितो, तो सकाळपासून उपाशी उभा आहे’ असा निरोप कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना दिला. त्यानंतर वरच्या माळ्यावर थांबलेल्या राज ठाकरेकडून तळ मजल्यावर थांबलेल्या चिमुकल्याकडे निरोप आला. ‘तू आधी नाश्ता कर, काहीतरी खा. त्याच्यानंतरच मी तुला भेटणार आणि माझे ऑटोग्राफ देणार.’

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!