Home » रस्ता नसलेल्या गावात आमदाराने चार किलोमीटर पायी नेले गोंदिया कलेक्टर, एसपी

रस्ता नसलेल्या गावात आमदाराने चार किलोमीटर पायी नेले गोंदिया कलेक्टर, एसपी

by नवस्वराज
0 comment

गोंदिया : विदर्भातील अनेक आजही अशी आहेत ज्यांना स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 वर्षांनंतरही मूलभूत सुविधा नाहीत. रस्ते नाहीत, पिण्याचे पाणी नाही, वीज नाही. अशाच एका गावात आमदाराने गोंदियाच्या जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना पायी नेले. थोडे नव्हे तर तब्बल चार किलोमीटर भर चिखलातून.

गोंदिया जिल्ह्यातील चुंभली हे त्या गावाचे नाव. देवरी तालुक्याअंतर्गत चुंभली गाव येते. येथे आजपर्यंत रस्ता नाही. पूल नाही. देवरीला जायचे असेल तर गावाकऱ्यांना बोटीतून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात चुंभली वासीयांना चार किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागतो. नदीतील बोट तुटली आहे. आमदार सहशराम कोरेटे यांनी थेट जिल्हा प्रशासनालाच या गावात आणत रस्त्याची वस्तुस्थिती दाखवून दिली. जिल्हाधिकरी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी या गावात हजेरी लावत परिस्थितीचा आढावा घेतला. आयएएस, आयपीएस अधिकऱ्यांना चार किलोमीटर चिखल तुडवावा लागल्यानंतर त्यांनी रस्ता व पूल बांधकामची ग्वाही दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!