अकोला : कंत्राटी भरतीवरुन महाराष्ट्रातील लाखो तरूणांना बेरोजगार करण्याचे महापाप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. आता हेच उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पाटोले तरुणांची दिशाभूल करत आहेत. या महापाप करणाऱ्या नेत्यांनी आता महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागावी, यासाठी बाळापुर तालुका भाजपाने निषेध आंदोलन केले.
अध्यक्ष अंबादास घेंगे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष आनंद पुंडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे, शहराध्यक्ष रमेश लोहकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा निषेध म्हणुन बाळापुर बस स्थानकासमोर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले.
यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला. किशोर गुजराथी, किशोर कुचके, दिलीप ठाकरे, बंडु काळी, विजय फुकट, मुरलीधर माळी, प्रवीण हेलगे, गजानन खारोडे, मंजूर शहा, राजेश्वर वैराळे, शामराव शेलार, विपुल घोगरे, सुनिल मानकर, मोहन धरमठोक, अशोक मंडले, प्रकाश श्रीमाळी, राम घाटे आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. सुशिक्षित बेरोजगार तरूणांना बेरोजगार करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना निर्णय झाले. आता आपल्या महापापावर पांघरूण घालण्यासाठी हेच नेते महायुती सरकारला बदनाम करत असल्याचा पर्दाफाश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार लोकांची माफी मागितली पाहिजे असे श्रीकृष्ण मोरखडे म्हणाले.