Home » Nitin Gadkari : मायनिंगसाठी प्रशिक्षण मिळणार गोंडवाना विद्यापीठात

Nitin Gadkari : मायनिंगसाठी प्रशिक्षण मिळणार गोंडवाना विद्यापीठात

Gondwana University : नितीन गडकरी म्हणाले, कुशल मनुष्यबळ तयार होणार

by नवस्वराज
0 comment

Advantage Vidarbha : गडचिरोली जिल्‍ह्यातील मायनिंगच्‍या बाजूला स्टील उद्योग सुरू करता येऊ शकतो. त्‍यासाठी लागणारे कुशल मनुष्‍यबळ तयार करण्‍यासाठी गोंडवाना विद्यापीठात प्रशिक्षण कार्यक्रम राबवता येतील. स्‍थ‍ानिक युवकांना प्राधान्‍य दिल्‍यास मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्‍त होऊ शकतील असा आशावाद केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला.

असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंटतर्फे (एड) व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून ‘खासदार औद्यो‍गिक महोत्‍सव–अॅडव्‍हांटेज विदर्भ’चे आयोजन राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारतीच्‍या परिसरात करण्‍यात आले आहे. महोत्‍सवाच्‍या समारोपाच्‍या दिवशी सकाळच्‍या सत्रात ‘इमर्जिंग हब फॉर मायनिंग ओरिजनल इक्‍वीपमेंट मॅन्‍युफॅक्‍चरर’ विषयावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी ज‍ितेंद्र नायक, लॉयड्स मेटल अँड एनर्जीचे बी. प्रभाकरण, कोमात्‍सू मायनिंगचे सोमनाथ दत्‍ता मजुमदार, एसएमएस ग्रुपचे आनंद संचेती, एमईसीएलचे इंद्रा देव नारायण, कॉम्‍पेन्‍सस कंपनी पोलंडचे मात्‍यूज वोरा, व्‍हॉल्‍वो इंड‍ियाचे दिम‍ित्रोव कृष्‍णन यांची उपस्‍थ‍ित होते.

गडच‍िरोलीमध्‍ये चांगल्‍या प्रतीचे लोह उपलब्‍ध असून तेथे एक चांगले स्‍टील मॅन्‍युफॅक्‍चरींग हब तयार होऊ शकतो, असे नितीन गडकरी म्‍हणाले. नागपुरात मिहान सेझसारखी उत्‍तम औद्योगिक वसाहत असून, चांगल्‍या पायाभूत सुविधा आहेत. वीज, 24 x 7 पाणी, सिंदी ड्रायपोर्टसारखे लॉजिस्‍टीक हब असून देशभरात कुठेही मालवाहतूक केली जाऊ शकते. त्‍यामुळे भविष्‍यात नागपूर हे ‘लॉज‍िस्‍टीक कॅपिटल’ होऊ शकते. त्‍यामुळे गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

‘डेव्‍हलपमेंट ऑफ लॉजिस्‍टीक अँड वेअरहाऊसिंग इंडस्‍ट्री इन विदर्भ रिजन’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. सत्राला शिवकुमार राव, कोईन कन्‍सल्‍टींगचे आरिफ सिद्धीकी, नॅशनल हायवे लॉजिस्‍टीकचे के. साईनाथन, मॅनकाइंड फार्माचे भारत भूषण राठी, रिलायबल कार्गोचे सुधीर अग्रवाल, गोदाम लॉज‍िस्‍टीकचे महावीर जैन, लॉजिस्‍टीक पार्क इंड‍ियाचे विरेन ठक्‍कर यांचा सहभाग होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!