कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आज ३.४ रिक्टर स्केलचा भूकंप जाणवला आहे. हे भूकंपाचे धक्के सकाळी ६.४५ च्या सुमारास जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्रस्थळ ५ किमी खोल असल्याची माहिती देण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून ५ किमी खाली होता. कोल्हापूरपासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.
कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ३.४ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह जवळच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पहाटे ६.४० मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्णाण झाले होते. कोयना धरणापासून २० किलोमीटर अंतरावर हे भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर कोल्हापूर, सांगली, सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरापासून १५ किमी परिसरात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.