अकोला : सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीतर्फे २० मार्च, सोमवारी मोठे राम मंदिर व राजेश्वर मंदिरात रुद्राक्ष अनुष्ठान करण्यात आले. समाजसेवेच्या व्रताला तसेच सनातन धर्माची पताका अविरत ठेवण्यासाठी राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात वेदपाठी ब्राह्मणांनी मंत्रोच्चार करून पूजा, अभिषेक व हवन केले.
राजेश मिश्रा, अनिता मिश्रा, अरुण शर्मा, पूनम शर्मा, दिलीप सोनी, रमा सोनी, नितिन मिश्रा, ज्योति मिश्रा, मनोज अग्रवाल, सोनल अग्रवाल, दिनेश गुप्ता, चेतना गुप्ता, गणेश बुंदेले, शारदा बुंदेले, नितिन ताकवाले, वर्षा ताकवाले, अजय दुबे, मंजु दुबे, मनिष बिसेन, रूपम बिसेन, गोपाल लव्हाळे, मेघा लव्हाळे, शुभम ढोरे, अश्विनी ढोरे, राजेश इंगळे, पूजा इंगळे, नीलेश वानखडे, पुनम वानखडे, पवन शाईवाले, हर्षा शाईवाले, रवी श्रीवास, प्रमिला श्रीवास, मुन्ना उकर्डे, सुनिता उकर्डे, तरुण बगेरे, उषा बगेरे, अश्विन अग्रवाल, संगिता अग्रवाल, पंकज अग्रवाल हे ५१ जोडपे अनुष्ठानात सहभागी झाले होते.
वेदपाठी ब्राह्मण आनंद कंद महाराज, पंडित सचिन शर्मा, महेश कापडी, लखन शर्मा, धीरज तिवारी, श्याम झा, महेश जोशी, कैलाश शुक्ला, राजेंद्र पंडित, अंबिका प्रसाद मिश्र, जनक जोशी, दिलीप छदाणी, रोहित मिश्रा यांनी धार्मिक विधी पार पाडला. गुढीपाडव्याच्या दिवशी अकोला महानगर व लगतच्या परिसरातील मंदिरात स्टॉल लावून भक्तांना नि:शुल्क रूद्राक्ष देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला आमदार नितीन देशमुख, निहार अग्रवाल, नवीन गुप्ता, मोहन गुप्ता, शरद तुरकर, शैलेश खरोटे, राहुल भगत, मंजुषा शेळके, सुनीता श्रीवास प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गजानन चव्हाण, संजय अग्रवाल, योगेश गीते, चेतन मारवाल, देवा गावंडे, रवी अवचार, रवी मडावी, धर्मेंद्र राकेश, आशुतोष मिश्रा,धीरज मिश्रा, बबलू ऊके, हेमंत मिश्रा, रुपेश ढोरे, विक्की ठाकूर, धनराज घाटोले, रोशन राज, आयुष शाहू, सुनिल दुर्गिया, पिंटू तराळे, यश शर्मा, धनंजय जानोरकर, केशव शर्मा, राजेश दिनोदिया, सुरेश मिश्रा, राम अग्रवाल, प्रशांत तराळे, दशरथ मिश्रा, दिनेश श्रीवास, पंकज श्रीवास, आशिष तिवारी, विजय दुबे, श्याम बुंदेले यांनी परिश्रम घेतल्याचे सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीतर्फे कळविण्यात आले आहे.