मुंबई : राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करु, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. “संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सगळेच कायदा लागू करतील असे मला वाटते”, असे फडणवीस म्हणाले.
“समान नागरी कायदा गोव्यात आहे, आता उत्तराखंड लागू करत आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात हे राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. हळूहळू सर्व राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करतील. शिवाय त्यांना करावाच लागेल”, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रही योग्यवेळी हा कायदा लागू करण्याबाबत विचार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.