अकोला : भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे स्व दत्तोपंत ठेंगडी, बाळासाहेब साठ्ये व अण्णाजी अकोटकर यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त अकोला परिमंडल तर्फे रविवार २७ जुलै रोजी अण्णासाहेब रोकडे मिलन सभागृहात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश भंडारी, अध्यक्ष नागपूर प्रादेशिक कार्यालय महावितरण, प्रमुख पाहुणे शरद शेंडे अध्यक्ष भारतीय मजदूर संघ अकोला जिल्हा, उद्घाटक रामेश्वर फुंडकर अध्यक्ष अकोला अर्बन को बँक, अनिल माहोरे राज्य सचिव कामगार महासंघ होते. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. मंचावरील उपस्थितांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
शरद शेंडे यांनी रक्तदानाचे महत्त्व विषद करून रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे सांगितले. वीज कामगार महासंघाच्या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पुर्वी रूग्णांना रक्त पुरवठा करतांना, रक्त घटक वेगळे करणे वगैरे प्रक्रिया करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगती मुळे आता हे काम सोपे झाले असल्याची माहिती रामेश्वर फुंडकर यांनी दिली. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
रक्ताची मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत असल्यामुळे, रक्ताचा तुटवडा जाणवतो, परिणामी अनेक रूग्णांना रक्त उपलब्ध न झाल्यामुळे जीव गमवावा लागतो. लोकांनी रक्तदाना बद्दलचा गैरसमज मनातून काढून, भयमुक्त होऊन रक्तदान करावे असे आवाहन गणेश भंडारी यांनी आपले अध्यक्षीय समारोपात केले.
शिबिरात पंधरा जणांनी रक्तदान केले. साई जीवन रक्तपेढीच्या चमूने रक्तसंकलनासाठी विशेष सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी निस्वार्थ रुग्ण सेवा परिवार अकोला, हेमंत देशपांडे क्षेत्र प्रभारी, नरेंद्र औतकर, रेलकर, मनोजअण्णा गणकर, दगडू खुळे, सतिश राठोड, संतोष माहोकार, गणेश घोपे, विकास कोकाटे, विनोद पाचकवडे, गणेश लहरिया, अरुण गायकवाड, शुभम बारड, आदित्य काठोळे, रामकृष्ण शेगोकार, गोपाल सुर्यवंशी, विनय टोपरे, श्रीकांत गव्हाणकर, वसंत धर्मे, गणेश धारपवार, निलेश फाटकर, संतोष तारापुरे, अनिल बोरसे, निवृत्ती बडे, सचिन बिडवई यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन विवेक तापी यांनी तर आभार प्रदर्शन विनोद फुलारी यांनी केले.