नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. हिवाळी अधिवेशन 23 दिवसांचे असून त्यात 17 बैठक होणार आहेत.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना हे अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशन कोणत्याही निर्बंधाशिवाय पार पडण्याची शक्यता आहे. भारत जोडो यात्रेत व्यस्त असल्याने काँग्रेस खासदार राहुल गांधी या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार नाही. भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या रॅलीला गेले नाहीत. कॉंग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीत राहुल आणि सोनिया गांधी यांच्यासह 40 बड्या नेत्यांची नावे समाविष्ट केली आहेत.