Home » अकोल्यात श्रमिकावर बिबट्याचा हल्ला

अकोल्यात श्रमिकावर बिबट्याचा हल्ला

by नवस्वराज
0 comment

अकोला : शहराजवळ असलेल्या हिंगणा परिसरातील मिनू ग्लास फॅक्टरीत शुक्रवारी दुपारी बारा वाजता बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात भोला जाधव  व राकेश नामक श्रमिक जखमी झालेत.  ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या हिंगणा व नवीन हिंगणा गावांमध्ये हा बिबट्या दिसला. शुक्रवारी सकाळपासूनच या बिबट्याची दहशत गावात आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यातील भोला यादव यांची प्रकृती गंभीर असून, राकेश राजभर हे किरकोळ जखमी झाले आहेत. आणखी दोन युवकांवरही या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी हिंगणा परिसरात दाखल झालेत. जुने शहरचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, उपनिरीक्षक रवींद्र करणकार, श्याम पोधाडे, छोटु पवार यांच्यासह वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचा शोध सुरू केला आहे. परिसरातील नागरीकांनी सतर्क रहावे असा इशाराही दिला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!