Home » Court News : न्यायाधिशासोबत वादानंतर वकील तुरुंगात

Court News : न्यायाधिशासोबत वादानंतर वकील तुरुंगात

Cheque Case : चेक अनादर प्रकरणावर सुरू होती सुनावणी

by नवस्वराज
0 comment

Gondia : जिल्हा न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असतांना, न्यायाधीशाने पक्षकाराला वकील बदलण्याचा सल्ला दिला. त्यामुळे संतापून वकीलानी  (Lawyer) न्यायाधीशासोबत वादविवाद केला. यामुळे कोर्टाचा अवमान झाल्याने वकीलास 10 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. ही घटना गोंदियात घडली.

धनादेश अनादर प्रकरणाची सुनावणी सुरू असतांना न्यायाधिशांनी पक्षकाराला वकील बदलण्याचा सल्ला दिला. पक्षकाराचे वकील पराग तिवारी यांनी यावर आक्षेप घेतला. न्यायाधीश कुलकर्णी यांच्याशी वकील तिवारी यांनी वाद घातला. याप्रकरणात न्यायालयाचा अवमान झाल्याने न्यायाधीश कुलकर्णी यांनी वकील तिवारी यांना 90 रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास 10 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

आपली चूक नसल्यामुळे दंड भरणार नाही व माफीही मागणार नाही, अशी भूमिका वकील तिवारी यांनी घेतली. त्यामुळे त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. सदर घटनेमुळे गोंदिया जिल्हा न्यायालय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. 5) रोजी दुपारी ही घटना घडली.

गोंदिया न्यायालयात धनादेश अनादर प्रकरण सुनावणीसाठी आले. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पक्षकाराचे वकील पराग तिवारी न्यायालयात उशिराने दाखल झालेत. त्यामुळे न्यायाधीश कुलकर्णी यांनी पक्षकाराला वकील बदलण्याचा सल्ला दिला. यावर अॅड. तिवारी यांनी आक्षेप घेत न्यायाधीशांशी चांगलाच वाद घातला. त्यामुळे न्यायाधीश कुळकर्णी यांनी न्यायालयाचा अवमान केल्यामुळे अॅड. तिवारी यांना 90 रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास 10 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम भरण्याचा आदेशही काढला.

वकील पराग तिवारी यांनी आपली चूक नसल्याचे सांगितले. चूक नसल्यामुळे दंड भरणार नाही किंवा माफीसुद्धा मागणार नाही, असे तिवारी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्हा न्यायालय परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली. सायंकाळपर्यंत तिवारी यांना दंडाची रक्कम भरण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही दंडाची रक्कम न भरल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.

न्यायालयाच्या अवमाननाप्रकरणी शिक्षा सुनावण्याचा अधिकार न्यायाधीशांना आहे. याप्रकरणात आपली बाजू ऐकून घेण्यात आली नाही. तसेच बाजू मांडण्याचा वेळही देण्यात आला नाही, असे वकील पराग तिवारी यांनी सांगितले. गोंदिया न्यायालयात अवमाननाप्रकरणी कारवाईची अलीकडच्या काळातील हि पहिलीच घटना आहे. त्यामुळे विधिवतुर्ळात याप्रकरणाची जोरदार चर्चा आहे.  तिवारी यांच्यावरील कारवाईमुळे गोंदियातील वकील चांगलेच धास्तावले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!