Home » ‘आनंदाचा शिधा’मध्ये अकोल्यात पोह्याचा तुटवडा

‘आनंदाचा शिधा’मध्ये अकोल्यात पोह्याचा तुटवडा

by नवस्वराज
0 comment

अकोला : शिधापत्रिकाधारक कुटुंबांना रास्तभाव धान्य दुकानांमधून १०० रुपयांत एक किलो साखर, एक लिटर पामतेल आणि अर्धा किलो रवा, पोहे, मैदा व चनाडाळ इत्यादी शिधाजिन्नसांच्या ‘आनंदाचा शिधा’चे वाटप करण्यात येणार आहे. मात्र पोह्यांचा अत्यल्प साठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यात पुरेसा ‘पोहे’साठा उपलब्ध होण्याची प्रतीक्षा आहे. त्यात पोहे आणि मैदादेखील दिला जाणार आहे. मात्र त्यामध्ये पोहे साठा अत्यल्प उपलब्ध झाला आहे. आनंदाचा शिधामध्ये वाटप करण्यासाठी २७ ऑक्टोबरपर्यंत केवळ ३७ हजार ६२० किलो पोहे साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक ३ लाख ३१ हजार ५५१ कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’चे वाटप रास्तभाव धान्य दुकानांमधून करण्यात येणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!