Home » Akola News: एका चिमुकलीचे मंदिरासमोर खेळत असताना फुस देऊन अपहरण 

Akola News: एका चिमुकलीचे मंदिरासमोर खेळत असताना फुस देऊन अपहरण 

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : मंदिरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीस अज्ञात महिलेने काल दुपारी फुस लावून पळवून नेले होते. अकोला पोलिसांनी या प्रकरणाचा तात्काळ छडा लावून 24 तासाच्या आत आरोपी महिलेस बेड्या ठोकण्यात यश मिळवले. या तक्रारी वरुन पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे अज्ञात आरोपी विरूध्द अपराध क्र. २९/२४ कलम ३६३ भा. द. वि. अन्वये गुन्हा नोंद करून, सदर गुन्हयाचा तपास म.पो.उपनि. संजिवनी पुंडगे यांचे कडे देण्यात आला. (Kidnapping of a child while playing in front of a temple)

दिनांक ०५. जानेवारी २०२४ रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोला येथे फिर्यादी रवि पावन मलाकार, ( वय ३५ वर्ष, राहणार प्रकाश नगर, महाकाली, मिनार स्टेशन जवळ, पो.स्टे. गांधी चौक, चंद्रपुर)यांनी तक्रार दिली की, दिनांक ०५.०१.२०२४ रोजी त्यांची मुलगी कु. गुडडी रवि मलाकार, (वय ०५ वर्ष) ही दुपारी १२.३० ते १४.०० वाजता दरम्यान टिळक पार्क जवळील महादेव मंदीराजवळ खेळत असतांना, एका अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवुन नेले.

 

या गुन्हयाचे तपासात अपहत मुलीचा व आरोपीचा शोध घेण्या करीता स्थानिक गुन्हे शाखा व रामदासपेठ पोलीसांनी संयुक्त मोहीम राबविली. त्यामध्ये रामदासपेठ पोलीसांना २४ तासाचे आत अपहत मुलीचा व आरोपीचा शोध घेवुन गुन्हयातील महीला आरोपी नामे सलमा परविन अकबरशा उर्फ अजंली रामदास तायडे ( वय ४० वर्ष, राहणार बांबु वाडी शंकर नगर अकोटफैल अकोला) हीस ताब्यात घेतले. आरोपी महिलेस अपहत मुलगी हीचे बाबत विचारपुस केली असता, तिने अपहत मुलीचे अपहरण केल्या बाबत कबुली दिली. यावरून आरोपी महीलेचे राहते घर बांबु वाडी शंकर नगर येथुन अपहत मुलगी कु. गुडडी वय ०५ वर्ष हीला सुखरूप ताब्यात घेण्यात आले आहे. कोणत्या उद्देशाने बालीकेचे अपहरण केले याबाबतचा तपास पो.स्टे. रामदासपेठ पोलीस करीत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!