अकोला : किकबाॅक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन अकोला जिल्ह्याच्यावतीने अकोला चिल्ड्रेन्स, कॅडेट ॲण्ड ज्युनिअर सिलेक्शन किकबाॅक्सिंग चॅम्पियनशिप २०२३ एसएलआरजी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कॉलेज, शिवशक्ती प्रतिष्ठान, हिंगणा रोड, कौलखेड येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यातील १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री व क्रीडा मंत्री गुलाबराव गावंडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेत अकोला किकबाॅक्सिंग रेफरी संदीप बुंदे, व्यंकटेश शर्मा व धीरज सरदार यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यावेळी प्रशिक्षक प्रतिक्षा वानखडे, आविष्कार भोजने यांचे मार्गदर्शन लाभले. किकबाॅक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन जिल्हाध्यक्ष अनंत पाचकवडे, सचिव संगिता सुरळकर, उपाध्यक्ष हरीष डिंकुटवार, ऋषिकेश कोगदे, अभिजित ढामोडे, सौरभ तराळे, यश आमले, इतर सदस्य व खेळाडूंच्या पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.