Home » Ayodhya Ram Mandir : राम बहुजनच; जितेंद्र आव्हाड यांचे आणखी एक वक्तव्य

Ayodhya Ram Mandir : राम बहुजनच; जितेंद्र आव्हाड यांचे आणखी एक वक्तव्य

by नवस्वराज
0 comment

Nagpur : राम बहुजनच आहे. राम क्षत्रिय आहे. त्यांनी सांगावे की राम क्षत्रिय नव्हता म्हणून. राम क्षत्रिय आहे, म्हणजेच तो बहुजन झाला आणि देशात बहुजनांची संख्या जास्त आहे. भाजपावाल्यांनी राम आमचाच आहे असे म्हणणे चुकीचे आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नागपूर येथे केला.

आम्ही बहुजन आहोत. आम्ही मटण खातो त्यामुळे आपण रामाबद्दल तेव्हा बोललो होतो. रामाबद्दल वक्तव्यावर आपण खेदही व्यक्त केला. नंतर आजवर आपण काहीच बोललो नाही, असे आव्हाड म्हणाले. रामनवमी नसताना 22 जानेवारीची तारीख निवडली गेली आहे. या तारखेचा आणि यात रामाचा काही संबंध नाही. चार शंकराचार्य वास्तू अपूर्ण आहे असे सांगत असताना, त्यात प्राणप्रतिष्ठा करू नये असे सांगत असताना, त्यांना वेड्यात काढले जात आहे. भाजपवाल्यांचे कॅलेंडरही वेगळे, त्यांचे पंचांगही वेगळे आता तेच पंचांगकर्ते झाले आहे अशी टीका आव्हाड यांनी केली.

मटणाची तुलना भाजपवाल्यांनी शेणाशी केली. मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो असे म्हणणार असाल तर देशातील 80 टक्के लोक शेणच खातात. भाजपातील अनेक लोक मटण खातात. म्हणजे ते शेण खातात असे म्हणायचे काय, असा सवालही त्यांनी केला.

Jitendra Awhad said at nagpur that shree ram was bahujan

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!