Home » Nashik Crime : आंतरराज्यीय गुटखा तस्कराला पोलिसांकडून अटक

Nashik Crime : आंतरराज्यीय गुटखा तस्कराला पोलिसांकडून अटक

Gutkha Smuggling : अनेक ठिकाणांवरून केला जात होता पुरवठा

by नवस्वराज
0 comment

Police Action : राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना गुटख्याची सर्रासपणे विक्री सुरू आहे. गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्य गुन्हेगार इसरार मन्सुरी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली आहे. त्याची एक मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईकडे जाणारा कंटेनर पकडून सुमारे 21 लाखांचा गुटखा जप्त केला होता. इगतपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अमृत सिंह (रा. वडवेली), पूनमचंद चौहाण (रा. सकारगाव) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली असता गुटख्याची साठवणूक करून राज्यात तस्करी करणारा मुख्य गुन्हेगार इसरार मन्सुरी असल्याची माहिती मिळाली. मन्सुरी हा महाराष्ट्र व अन्य राज्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करत असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी मन्सुरी याला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक इंदूर येथे पोहोताच शहरातील राऊ परिसरात पाळत ठेवली. इसरार मन्सुरी पथकाच्या टप्प्यात येताच त्याला जेरबंद करण्यात आले. मन्सुरी याला न्यायालयात हजर करण्यात आले. मध्य प्रदेशातील इंदूर येथे मन्सुरी गुटख्याची साठवणूक करतो. त्यानंतर कंटेनरमधून चोरटी वाहतूक करून विविध राज्यात गुटखा पुरवितो. आंतरराज्यीय गुटखा तस्कर इसरार मन्सुरी याला अटक करण्यात आल्यामुळे गुटखा तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचता, येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!