Home » Lok Sabha Election 2024 : अकोल्यात लागले भाजपच्या विरोधात बॅनर

Lok Sabha Election 2024 : अकोल्यात लागले भाजपच्या विरोधात बॅनर

Voter's Against BJP : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधात रोष

by नवस्वराज
0 comment

Akola : महानगरातील गोरक्षण रोड, भागातील प्रभाग क्रमांक 20 मधील महिलांनी ‘बस करा विकास’ अशा शिर्षकाचे होर्डिंग लावले आहे. नेत्यांनी मत मागण्यासाठी या परिसरात येऊ नये, असे होर्डिंगवर लिहिले आहे. या होर्डिंगने नागरीकांचे लक्ष वेधले असून, चर्चचा विषय ठरत आहे.

सर्व्हिस नाल्या व रस्त्याच्या समस्यांमुळे रिद्धी-सिद्धी कॉलनीतील नागरिक मागील अनेक वर्षांपासून त्रस्त झाले आहेत. परिसरातील महिलांनी याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ‘बस करा विकास’ तसेच नेत्यांनी मत मागण्यासाठी आमच्या परिसरात येऊ नये, असा इशारा देणारे बॅनर लावण्यात आले आहे.

अकोल्यात अनेक वर्षांपासून भाजपाचे खासदार, आमदार आहेत. महानगरपालिकेत देखील भाजप सत्तेत होती. आम्ही भाजपचे मतदार आहोत. तरी अनेक वर्षांपासून या भागात सर्व्हिस लाइन व रोड अशा मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मत मागण्यास या परिसरात येऊ नये, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या आहेत.

भाजपा सत्तेत असताना महानगरात भरपूर कामे करण्यात आली. काँग्रेस आणि भाजपच्या काळात झालेल्या कामाची तुलना केल्यास भाजपच्या काळात अधिक विकासात्मक कामे झाल्याचे दिसून येईल. विरोधी पक्ष भाजपाला बदनाम करण्यासाठी ही बॅनरबाजी करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा महानगराध्यक्ष जयंत मसने यांनी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!