Home » नागपूर हायकोर्टाची कुलपतींसह विद्यापीठाला नोटीस

नागपूर हायकोर्टाची कुलपतींसह विद्यापीठाला नोटीस

by नवस्वराज
0 comment

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अधिष्ठाता नियुक्तीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांना नोटीस बजावली आहे.

नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा अर्थात सीनेट आणि व्यवस्थापन परिषद अर्थात मॅनेजमेंट कौन्सिलच्या नियुक्त्या वादात सापडल्या आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी डॉ. प्रशांत कडु यांची आंतरविद्याशाखीय अधिष्ठातापदी (इंटरडिसिप्लीनरी कमिटी डीन) केलेली नियुक्ती वादात सापडली आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेचे डॉ. कडु यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी खंडपीठाने कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना व नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना नोटीस बजावत दोन आठव‌ड‌्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्यासह कुलगुरू डॉ. सुभाष चौधरीख् कुलसचिव डॉ. राजू हिवसे, डॉ. प्रशांत कडू यांना या याचिकेमध्ये प्रतिवादी करण्यात आले आहे. माजी सीनेट सदस्य अॅड. मनमोहन बाजपेयी यांनी ही याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने याचिका स्वीकारत प्रतिवादी पक्षाला उत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!