अकोला : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे रेल्वे स्टेशन चौक व हरिहर पेठ येथे १८ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रेल्वे स्टेशन चौकातील लोकशाहीर, साहित्यरत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला भाई प्रभाकर वानखेडे, सुरेश जाधव, राम खरात यांनी माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले.
हरिहर पेठ येथे आण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करुन वृक्ष्ररोपण करण्यात आले. याप्रसंगी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र कथन करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ हे उत्कृष्ट मराठी कवी व लेखक होतेच, त्यांनी कविता आणि लेखनाच्या माध्यमातून कायम समाज प्रबोधनाचे कार्य केले. समाजसुधारणेसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. कामगारांचे ते कैवारी होते, त्यांच्या समस्या अण्णाभाऊंनी जगासमोर ठळकपणे मांडल्या, असे डॉ अशोक ओळंबे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला भाजपा नेते डाॅ अशोक ओळंबे, शिवसेना शिंदे गटाचे गोपाल नागपुरे, भाजपा जिल्हा सदस्य संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ता सुरज साहू, अब्दुल सलाम, निलेश बोबडे, भाई प्रभाकर वानखडे, सुरेश जाधव, प्रशिक सावळे, कालुभाई, गणेश मानकर, प्रकाश वानखडे, गणेश आमटे, सादिक कुरेशी, अविनाश जाधव, राघव, राम खरात, श्याम खरात, संतोष वाडी, सुरेश वाघमारे, रविंद्र जैन, गजानन गोलाईत आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.