Home » पाठिंब्याच्या मुद्द्यावर अमरावतीत पदवीधर मतदार संघातील उमेदवारावर हल्ला

पाठिंब्याच्या मुद्द्यावर अमरावतीत पदवीधर मतदार संघातील उमेदवारावर हल्ला

by नवस्वराज
0 comment

अमरावती : अज्ञात इसमांनी पाठिंबा देण्यावरून वाद घालत पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विकेश गोकुल गवाले यांच्यावर हल्ला केला. मोर्शी येथे जाताना माहुली जहागीरजवळ हा प्रकार घडला.

गवाले यांच्यावर हल्ला चढविल्यानंतर आरोपी फरार झालेत. या हल्ल्यात विकेश गवाले जखमी झाले. माहुली येथे काही नागरिकांनी त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे काहीवेळ धास्तावले होते. हल्लेखोरांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत आपल्या वाहनाने त्यांनी माहुली जहांगीर गाठले.

याप्रकरणी गवाले यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली. माहुली जहागीर पोलिसांना माहिती दिल्यानंतरही मदत मिळाली नाही, असा आरोप गवाले यांच्या नातेवाईकांनी केला. अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील मतदानासाठी अवघे काही दिवस उरले असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!