Home » बंडखोरीनंतरचे सर्व जीआर राज्यपालांनी मागविले

बंडखोरीनंतरचे सर्व जीआर राज्यपालांनी मागविले

by नवस्वराज
0 comment

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे. सरकारने काढलेले सर्व शासन आदेश (जीआर) सादर करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय उलथापालथ होत असताना, मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये शासन आदेश ( जीआर ) काढण्याचा सपाटा सुरू झाला आहे. या प्रकाराची दखल राज्यपाल कोश्यारी यांनी घेतली आहे. २२, २३ व २४ जून या तीन दिवसांमध्ये किती शासन निर्णय काढण्यात आले आहे. त्याची माहिती पाठविण्यात यावी, अशा आशयाचे पत्र मुख्य सचिवांना पाठवले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मागील आठवड्यात विधानपरिषद विरोधी पक्ष नेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात अंधाधुंद परिस्थिती निर्माण झाली आहे. चुकीच्या पद्धतीने शासकीय आदेश काढण्याचा सपाटा राबविला जात असून त्यावर राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यपालांना केली होती. तसे पत्र त्यांनी राज्यपालांना लिहिले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!