Home » जगातील १२ देश जिथे आयकर भरावा लागत नाही

जगातील १२ देश जिथे आयकर भरावा लागत नाही

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : आपल्या देशातील नागरिकांच्या उत्पन्नावर आयकर लावत अनेक देशातील अर्थव्यवस्थेला आधार देण्यात येतो. भारतातही नागरिकांना त्यांच्या मिळकतीवर आयकर भरावा लागतो. परंतु जगातील १२ देश असे आहेत जिथे नागरिकांना आयकर भरावा लागत नाही. कोणते आहेत हे देश जाणून घेऊया.

सोमालिया : सोमालिया येथील परिस्थिती फारशी चांगली नाही. येथे प्रतिकूल परिस्थिती असली तरी देशातील नागरिकांना आयकर लावण्यात येत नाही. येथे लोकांना फारशा मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. कदाचित त्यामुळेही तेथील सरकारने आयकर लावला नसावा. नौरु : जगातील सर्वांत लहान बेट असलेले राष्ट्र म्हणजे नौरु. ८.१ चौरस मैल क्षेत्रफळ असलेल्या या देशातील लोकांवर आयकर नाही. मोनाको : युरोप खंडातील सर्वांत लहान देश म्हणून मोनाकोकडे पाहिले जाते. हा देशही आयकरमुक्त आहे. मालदिव : पर्यटन व्यवसायामुळे या देशातील आर्थिक स्थिती मजबूत आहे. त्यामुळे हा देशही आयकर लावत नाही. कतार : तेलाच्या भक्कम साठ्यांमुळे कतारची अर्थव्यवस्था मजबूत आहे. तेलामुळे कतार छोटा देश असला तरी अर्थसंपन्न आहे. त्यामुळे येथे आयकर आकारला जात नाही. कतारमधील नागरिक श्रीमंत प्रवर्गात मोडतात.

ओमान : कतारप्रमाणे ओमानची अर्थव्यवस्थाही तेलामुळे भक्कम आहे. नैसर्गिक गॅसचे साठेही येथे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथेही आयकर लावण्यात आलेला नाही. कुवैत : ओमान, कतारप्रमाणे हा आखाती देशही तेल आणि नैसर्गिक वायूने संपन्न आणि आयकर मुक्त आहे. याशिवाय अमेरिका खंडातील कॅरिबियन प्रदेशात येणारा कॅमैन आयलॅड्स पर्यटन उद्योगामुळे, तेलाच्या साठ्यांमुळे दक्षिण पूर्व आशियातील ब्रुनेई, बहिरन, आणि जगातील सर्वांत श्रीमंत देशांपैकी एक असलेल्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्येही आयकर आकारला जात नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!