Home » अकोल्यात जुने शहराचा राजा ‘वरद विनायक’चे आगमन

अकोल्यात जुने शहराचा राजा ‘वरद विनायक’चे आगमन

by नवस्वराज
0 comment

अकोला : जुने शहरातील वीर हनुमान गणेशोत्सव मंडळाच्या जुने शहरचा राजा ‘वरद विनायक’चे आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला परिसरात आणण्यात आले.

 

 

जुने शहर येथील श्री वीर हनुमान व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाचे कार्यकर्ते १९७८ पासून गणेशोत्सव साजरा करतात. वीर हनुमान गणेशोत्सव मंडळ व श्री वीर हनुमान व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाचे कार्यकर्ते विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रमही राबवितात. गणेशोत्सवाच्या काळात मंडळ गेल्या तीन वर्षांपासून अष्टविनायकाची स्थापना करीत आहे. यावर्षी अकोलेकरांना अष्टविनायकातील चवथ्या व महडच्या वरद विनायकाचे दर्शन होणार आहे. रविवार, २८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी गणरायाची मूर्ति किल्ला चौकातून ढोल, ताशांच्या गजरात मंडळाच्या परिसरात आणण्यात आली. ढोलताशांसह ९० मुले-मुली असलेल्या श्री राजराजेश्वर पथकाने गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केले. आतिशबाजी व पुष्पवृष्टीने श्री गणेशाचे स्वागत करण्यात आले. थाटात आणि उत्साहात निघालेली मिरवणूक जुन्या शहरात कौतुक व चर्चेचा विषय ठरली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!