Home » Gadchiroli : पोलिसांवर घात करण्याचा माओवाद्यांचा कट उधळला

Gadchiroli : पोलिसांवर घात करण्याचा माओवाद्यांचा कट उधळला

Naxal Movement : गोंडरीच्या जंगलात स्फोटके जप्त

by नवस्वराज
0 comment

Police Action : माओवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहोचविण्यासाठी. कुरखेडा तालुक्यातील कोटगुलपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या, पहाडाच्या पायथ्याजवळ गोंडरी जंगल परिसराकडे जाणाऱ्या पायवाटेवर स्फोटके लाऊन ठेवल्याचे उघडकीस आले. कोटगुलचे प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी यांना ही गुप्त माहिती मिळाली होती. माओवाद्यांकडून पोलिसांना नुकसान पोहोचविण्यासाठी ‘टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन’ (TCOC) अभियान मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत राबविले जाते. ही स्फोटके मोठा घातपात घडविण्याच्या उद्देशाने कुरखेडा तालुक्यातील कोटगुल पहाडीजवळ ‘प्रेशर कुकर’ मध्ये लाऊन ठेवण्यात आली होती.

माहिती मिळताच कोटगुलचे प्रभारी अधिकारी धनंजय कुलकर्णी यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (BDDS) बोलावून जंगलाच्या परिसरात शोधमोहीम राबविली. अत्याधुनिक उपकरणाद्वारे शोधमोहीम सुरू केली. तपासणीदरम्यान एक ते दोन फूट खड्डे करून स्फोटके ‘प्रेशर कुकर’मध्ये ठेवण्यात आल्याचे आढळले. स्फोटके ज्याठिकाणी होती, त्याच जागी सुरक्षितपणे नष्ट करण्यात आली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रभारी अधिकारी मयूर पवार, हवालदार पंकज हुलके, अनंत सोयाम, अंमलदार सचिन लांजेवार, तिम्मा गुरनुले यांनी ही यशस्वी कारवाई केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!