Home » Gadchiroli News : कसनसूर उपकमांडर दुर्गेश वट्टी चकमकीत ठार

Gadchiroli News : कसनसूर उपकमांडर दुर्गेश वट्टी चकमकीत ठार

by नवस्वराज
0 comment

Gadchiroli | गडचिरोली : पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत दुर्गेश वट्टी हा कट्टर माओवादी उपकमांडर ठार झाला. महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सिमेवर बोधीटोलाजवळ गुरुवारी (ता. 14) ही चकमक झाली. दुर्गेशचा त्याचा एक साथीदारही चकमकीत मारला गेला आहे. छत्तीसगडमधील गोडलावही पोलिस स्टेशनपासून सुमारे 10 किलोमीटरवर असलेल्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला येथे माओवादी मोठ्या प्रमाणावर जमले होते.

2019 मध्ये जांभुळखेडा येथे माओवाद्यांची भीषण स्फोट घडविला होता. त्यात गडचिरोलीतील 15 पोलिस शहीद झाले होते. या स्फोटाच्या मुख्य सूत्रधारांपैकी दुर्गेश हा एक होता. (Gadchiroli Police Shot Dead Naxal Deputy Commander Durgesh Vatti In Encounter) माओवाद्यांजवळ यावेळी एके-47 व सेल्फ लोडिंग रायफल (SLR) बंदुकीही होत्या, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी ही माहिती दिली. या मोहिमेसाठी गडचिरोली पोलिसांसह सी-60 कमांडोची चार पथकं पाठविण्यात आली होती. केंद्रीय राखीव पोलिस दलाची (CRPF) एक तुकडीही पोलिसांच्या मदतीसाठी गेली होती. दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास ही चकमक उडाली. पोलिसांसह काही आदिवासींवर हल्ला करण्याचा माओवाद्यांचा कट होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!