Home » भारती कृष्ण विद्या विहार मध्‍ये जी-२० रॅली उत्‍साहात

भारती कृष्ण विद्या विहार मध्‍ये जी-२० रॅली उत्‍साहात

by नवस्वराज
0 comment

नागपूर : भारती कृष्ण विद्या विहार येथे जी -२० अंतर्गत “वसुधैव कुटुंबकम्” या भावनेला अनुसरून आंतराष्ट्रीयस्तरावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात भारती कृष्ण विद्या विहार, पलोटी विद्यालय, सांदीपनी विद्यालय, प्रेरणा विद्यालय तसेच भारतीय विद्या भवनच्‍या विद्यार्थ्‍यांनी उत्‍स्फूर्त सहभाग नोंदवला.

या रॅलीत विश्व बंधुत्व, मैत्री, समानता, सद्भावना, एकता इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी स्लोगन प्रस्तुत केले. या संदर्भात विद्यार्थ्यांनी भावपूर्ण विचार देखील प्रस्तुत केले. विश्व पुनःनिर्माण संघाचे विश्वस्‍त तसेच, शाळा प्रबंधक समितीचे सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी या रॅलीची मशाल प्रज्वलित करण्याचा संदेश देऊन या भावनांना सप्तसुरांत जोडण्यास प्रेरीत केले. या रॅलीत प्रधानाचार्या छाया चतुर्वेदी, उपप्रधानाचार्या अनिता नंदा समुद्रे, पूर्व प्राथमिक व प्राथमिक पर्यवेक्षिका राखी पांडे, शैक्षणिक प्रभारी भावना घुबे, जी -२० चे सदस्य तसेच विद्यालय परिवार उपस्थित होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!