Home » अकोल्यात घड्याळीचे काटे फिरले; बळीराम सिरस्कार यांच्या हाती ‘कमळ’

अकोल्यात घड्याळीचे काटे फिरले; बळीराम सिरस्कार यांच्या हाती ‘कमळ’

by नवस्वराज
0 comment

अकोला : प्रदेशाध्यक्ष होताच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम विदर्भातील महत्वाचे शहर असलेल्या अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सिरस्कार यांनी मुंबईत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे देखील यावेळी उपस्थित होते. अकोल्यात सिरस्कार यांनी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या १२० कार्यकर्त्यांनी ‘कमळ’ जवळ केले आहे. आमदार रणधीर सावरकर, आमदार संजय कुटे, आमदार आकाश पुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाखळे आदी प्रमुख भाजप पदाधिकारी उपस्थित होते. अकोला शहरातील डॉ. सुशिलाबाई देशमुख महाविद्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

आमदारकीचे दशक

बळीराम सिरस्कार हे भारिप-बहुजन महासंघात होते. बाळापूर विधानसभा मतदार संघातून हे सलग दहा वर्ष आमदार होते. २०१९मध्ये त्यांनी भारिपमधुन अकोला पूर्वचे माजी आमदार हरीदास भदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने तीन वर्षात आश्वासनांची पूर्तता न केल्याने ते अस्वस्थ होते. महाविकास आघाडीची सत्ता कोसळल्यानंतर सिरस्कार यांनी भाजपचा मार्ग धरला. माळी समाजाचे प्रमुख नेता म्हणून अकोल्यात सिरस्कार ओळखले जातात.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!