अमरावती : आमदार बच्चू कडू बुधवार, ११ जानेवारी २०२३ अपघातात जखमी झालेत. बुधवारी सकाळी सकाळी अमरावती परतवाडा रिंगरोडवर रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली.
दुचाकीची धडक इतकी जबरदस्त होती की कडू यांच्या डोक्याला दुखापत झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी अमरावती येथे दाखल करण्यात आले. आमदार बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे. अमरावती येथुन रुग्णवाहिकेने त्यांना नागपुरातील न्युरॉन रुग्णालयात हलविण्यात आले. कडु यांना घेऊन रुग्णवाहिका नागपुरात दाखल होताच त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. कडु यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.