Home » विदर्भ, मराठवाड्यात शेतीचे सर्वांत मोठे नुकसान

विदर्भ, मराठवाड्यात शेतीचे सर्वांत मोठे नुकसान

by नवस्वराज
0 comment

नागपूर : पावसाचा मोठा तडाखा राज्यातील शेतीला बसला आहे. सुमारे २ लाख ३३ हजार ८९७ हेक्टरवरील खरीप हंगामातील पेरण्यांसह, नगदी पिके आणि फळबागांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. प्रारंभिक सर्वेक्षणात विदर्भ आणि मराठवाडा भागात झालेल्या नुकसानाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

नांदेडमध्ये ३६,१४४ हेक्टर, अकोल्यात ८६४ हेक्टर, अमरावतीत २७,१७० हेक्टर, यवतमाळमध्ये १२,२११३ हेक्टर, वर्ध्यात १६,१८७ हेक्टर, गोंदियात एक हेक्टर, नागपूरमध्ये १,९७४ हेक्टर, भंडाऱ्यात ३० हेक्टर, गडचिरोलीत ७४० हेक्टर आणि चंद्रपूरमध्ये १०,३९३ हेक्टर, असे एकूण २ लाख ३३ हजार ८९७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत झाले आहे. पुराचे पाणी शेतजमिनीत घुसून १ हजार ५४६ हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक ११४९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. नागपूरमधील ५८ हेक्टर क्षतीग्रस्त झाले आहे.

खरीप हंगामात पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्या खालोखाल कापूस, भात, कडधान्य पिकांचा समावेश आहे. अमरावतीत संत्रा पिकाला दणका बसला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील खरीप पेरण्या ६० टक्क्यांवर गेल्या होत्या. यापैकी बहुसंख्य क्षेत्राचे नुकसानच झाले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!