Home » अकोल्यात राज्यातील पहिला ॲग्री-टुरिझम

अकोल्यात राज्यातील पहिला ॲग्री-टुरिझम

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील पहिला ॲग्री टुरिझम (कृषी पर्यटन केंद्र) येत्या सहा महिन्यांत साकारला जाणार असून, येथेच या विषयावर प्रशिक्षण व पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यासाठीचा सामंजस्य करार या क्षेत्रातील एका कंपनीसोबत कृषी विद्यापीठाने केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विविध फळे, फुले, भाजीपाला, वनस्पती औषधींसह पिकांच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत. नवे संशोधन, तंत्रज्ञानाचे काम येथे अविरत सुरू आहे.

पाणलोट क्षेत्र व त्यावर अभ्यास येथे केला जात असून, विविध यंत्र, अवजारांचा विकास करण्यात आला आहे. ही माहिती एकाच ठिकाणी शेतकरी, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना बघायला व अभ्यास करायला मिळावी, यासह सर्वच विषयांचे जे नवे तंत्रज्ञान असेल ते अवगत करता यावे, खेळ व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम करता यावेत, असा कृषी विद्यापीठाचा मानस आहे. याकरिता या क्षेत्रात काम करणाऱ्या पुण्याच्या कृषी पर्यटन विकास केंद्राशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ग्रामीण युवकांना रोजगार मिळावा हा या पर्यटन केंद्रामागील उद्देश असून, प्रशिक्षणासाठी येथे प्रशस्त सभागृह बांधण्यात येणार आहे. येथे प्रशिक्षणासह प्रात्यक्षिकही करून दाखविले जाणार आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!