मालेगाव (नाशिक) : यशराज बॅनर्सचा टायगर थ्री चित्रपट १२ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात प्रेक्षक चित्रपट सुरू असताना चित्रपटगृहात फटाके फोडताना दिसतात. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मोहन सिनेमागृहामध्ये टायगर थ्रीचे प्रदर्शन सुरू असताना चित्रपटगृहात फटाके फोडण्याची घटना घडली. त्यामुळे धावपळ झाली. फटाक्यांची आतंशबाजी सुरू असताना काही प्रेक्षक जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळाले.
चित्रपटगृहातील आतंशबाजीचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी तपास सुरू करीत मोहन सिनेमा विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.