Home » Yavatmal : तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याने घेतले विष 

Yavatmal : तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्याने घेतले विष 

by नवस्वराज
0 comment

Yavatmal | यवतमाळ : नाला वळविण्यात आल्याने पिकांचे नुकसान झाले. वारंवार मागणी करून न्याय मिळत नसल्याने एका शेतकर्‍याने थेट तहसीलदारांच्या दालनात जात विषाचा घोट घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार पुढे येताच पायाखालची वाळू सरकलेल्या प्रशासनाने शेतकऱ्याला उपचारासाठी नेले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याऐवजी, सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा तहसीलदारांनी नोंदविला आहे.(Farmer Took Poison In Tehasildar Office At Arni Of Yavatmal District)

गौतम गेडे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकर्‍याचे नाव आहे. ते आर्णी तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहेत. त्याची आर्णी तालुक्यातील जवळा शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. सरकारकडून प्रत्येक वेळी उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याने खचून जात शेतकरी गेडे यांनी टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करणे अपेक्षित असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शेतकरीवर्गातून रोष व्यक्त होत आहे. आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी यावर संताप व्यक्त केला. अधिकार्‍यांनो, शेतकर्‍यांशी सन्मानाने वागा, असा इशारा त्यांनी दिला आहे. अधिकार्‍यांनी शेतकर्‍याची बाजू घेतली असती तर ही वेळ आली नसती. आता अधिकार्‍यांना पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

आर्णीच्या तहसीलदारांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी गौतम गेडे यांची बहीण श्‍वेता डेरे यांनी केली आहे. तहसीलदारांची बदली करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी दिला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!