Home » अकोल्यातील अकोलीच्या शिवमंदिरात पिंडीला डोळे आल्याची अफवा

अकोल्यातील अकोलीच्या शिवमंदिरात पिंडीला डोळे आल्याची अफवा

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोली बुद्रुक येथील शिव मंदिरात महादेवाच्या पिंडीला डोळे आले असल्याची अफवा पसरली. त्यामुळे येथे लोकांची चांगलीच गर्दी होत आहे.

महादेवाच्या मंदिरात पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याचे समजताच भाविकांची गर्दी मंदिरात उसळली. ही अफवा असल्याची काही नागरिकांमध्ये चर्चा सुध्दा आहे. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच महिला मंदिरात धाव घेऊ लागल्या, काही महिलांनी श्रद्धेपोटी महादेवाच्या पिंडीवरील तिसरा डोळाच उघडल्याचे सांगितल्याने गर्दीत आणखी भर पडली. मात्र,अंनिसने हा प्रकार अफवा असल्याचे म्हटले. आरतीसाठी येणाऱ्या महिला महादेवाच्या पिंडी समोर दिवा-बत्ती करतात. यावेळी काही महिलांनी शिवलिंगाच्या पिंडीवर बदल झाल्याचा दावा केला. याची माहिती इतर महिलांना समजताच अन्य महिलांनी मंदिरात धाव घेतली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शरद वानखडे यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. कुणीतरी जाणून-बुजून खोडसाळपणा केला असेल असेही ते म्हणाले. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये, असेही आवाहन अंनिसने केले आहे. या संदर्भात फोटो अथवा व्हिडिओ पाहिले असता कोणीतरी जाणून-बुजून शिवलिंगावर खड्डे केले असल्याचे दिसून येते, असाच चमत्कार आपोआप कधी होत नाही, मूर्ती बसवताना काही राहिलं असेल अथवा ही नवीन मूर्ती असेल, मात्र फोटोतील मूर्ती जुनी दिसते, त्यामुळे मूर्तीवर कोणीतरी जाणून खोडसाळपणा करून खड्डे पाडून डोळे पाडल्याचा आकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असा दावाही अंनिसने केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!