Home » Nagpur News : लोकसभेतील घटनेचे नागपुरात पडसाद; हिवाळी अधिवेशनाचे पासेस बंद

Nagpur News : लोकसभेतील घटनेचे नागपुरात पडसाद; हिवाळी अधिवेशनाचे पासेस बंद

by नवस्वराज
0 comment

Nagpur | नागपूर : लोकसभेच्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दोन व्यक्तीने गॅलरीतून उडी मारली. त्यानंतर त्यांनी एका स्प्रेच्या माध्यमातून लोकसभेत धुर पसरविला. या प्रकारामुळं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीतील या घटनेचे पडसाद नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनात उमटले. नागपुरातील विधान भवनाच्या गॅलरीचे पासेस देण्याचे काम तातडीनं थांबविण्यात आले. (Entry Passes To Nagpur Vidhan Bhavan Has Been Stopped After Incident In Lok Sabha)

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. अधिवेशन सुरु असतानाच काही दिवसांपूर्वीच नागपुरात 150 पेक्षा अधिक जीवंत काडतूसं सापडली होती. अमरावती येथे राज्यातील सर्वांत मोठा शस्त्रसाठा पकडण्यात आला होता. अशात दिल्लीतील संसदेत घडलेल्या या प्रकारानंतर सर्व राज्यातील विधान भवनांना, राज भवनांना, मंत्रालयांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागपूर विधान भवनात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी दिल्लीतील घटनेनंतर आणखी कडक करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहरात अधिवेशनाच्या निमित्तानं सुमारे 11 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!