Home » राष्ट्रमाता जीजाऊंच्या जन्मस्थळाचा वीजपुरवठा खंडित

राष्ट्रमाता जीजाऊंच्या जन्मस्थळाचा वीजपुरवठा खंडित

by नवस्वराज
0 comment

बुलढाणा : छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जीजाऊंच्या सिंदखेडराजा येथील जन्मस्थळाचा वीजपुरवठा खंडित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर कळस म्हणजे तेथील ‘सीसीटीव्ही’ यंत्रणादेखील दीर्घ काळापासून ठप्प आहे.

सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊंचा जन्म झाला होता. दरवर्षी राज्य व देशातील लाखो भक्त त्यांच्या जन्मदिनी १४ जानेवारीला तिथे नतमस्तक होतात. अश्या ऐतिहासिक व पवित्र स्थळाचा वीजपुरवठा २० दिवसांपासून खंडित आहे. याशिवाय प्रशासनाने कार्यन्वित केलेली सीसीटीव्ही यंत्रणादेखील एका वर्षापासून बंद आहे. बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आज ही गंभीर बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनातून २४ तासांच्या आत वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा आम्हाला काय करायचं ते आम्ही करू असा इशाराही  दिला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!