Home » शास्त्रज्ञांच्या कौतुकामागे निवडणुकीचा अजेंडा : वडेट्टीवार

शास्त्रज्ञांच्या कौतुकामागे निवडणुकीचा अजेंडा : वडेट्टीवार

by नवस्वराज
0 comment

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी टिका केली. नावं ठेवण्यात पंतप्रधान पटाईत आहेत, असे ते म्हणाले. चांद्रयान-3चे लँडिंग झाले त्या जागेला त्यांनी आता ‘शिवशक्ती’ हे नाव दिलं आहे. पंतप्रधान शास्त्रज्ञांना भेटायला गेले, याचा मनस्वी आनंद आहे. चंद्रयान तीन मोहीम यशस्वी केली. त्यासाठी शास्त्रज्ञांचे कौतूक व्हायला पाहिजे. परंतु नाव शास्त्रज्ञांचे घेऊन अजेंडा मात्र निवडणुकीचा असल्याचं दिसून येतेय असे वडेट्टीवार म्हणाले.

चांद्रयानातून निवडणूकीत त्यांना काही फायदा होतो का ते पाहुया, असे म्हणत वडेट्टीवारांनी भाजप नेत्यांना डिवचले. आजचा रोड शो मोदींनी शास्त्रज्ञांना सोबत घेऊन केला असता, तर त्यांना आनंद झाला असता, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांचा सन्मान केला गेला नाही, भाजपचा ना लढाईचा इतिहास आहे, ना देश उभारणीचा आणि आता देशाची विभागणी करू इच्छित असतील, तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. फोन टॅपींग प्रकरणात सीबीआय अपयशी ठरली. आरोपींना पाठीशी घालण्याचा आणि वाचवण्याचा हा प्रकार आहे. अगोदर जागतिक पातळीवर सीबीआयचं नाव होत. पण आता या संस्थेत वाटेल त्या पद्धतीने काम सुरू आहे. सीबीआय ही सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणारी संस्था झाली आहे, असे ते म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!