Home » Nagpur Gondkhairi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाचवले अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण

Nagpur Gondkhairi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाचवले अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण

by नवस्वराज
0 comment

Nagpur | नागपूर : नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळीच मदत केल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होईपर्यंत मुख्यमंत्री रुग्णालयात ठाण मांडून होते. (Eknath Shinde Helped Injured At Gondkhairi & Rushed To Hospital At Nagpur)

(ता. 18) नागपुरला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर कंपनीला भेट दिली. नागपुरकडे परत येत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ अपघात झाला होता. अपघातात ट्रक आणि दुचाकीची धडक झाली होती. दुचाकी चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. ट्रकला एक वेगन-आर कारही येऊन धडकली होती. या तिहेरी अपघातात दुचाकी स्वारासह कारमधील काही जण जखमी झालेत. गंभीर परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली.

मुख्यमंत्री स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ जखमीसाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन रुग्णालयाकडे रवाना केले. डॉक्टर जखमी दुचाकीचालकाला घेऊन नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आलेत. रुग्णालयात शिंदे यांनी जखमी तरुणाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याची सूचना केली. जखमी झालेल्या तरुणाचे नाव गिरीश केशव तिडके आहे. गिरीश नागपूरच्या गोंडखैरीवाडी येथील रहिवासी आहे. अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (रा. सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (रा. रामबाग मेडिकल चौक, नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (रा. मौदा, नागपूर) यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!