Home » Accident : टँकरचा पाइप फुटला; वाशिमच्या रस्त्यावर तेलच तेल

Accident : टँकरचा पाइप फुटला; वाशिमच्या रस्त्यावर तेलच तेल

by नवस्वराज
0 comment

Washim : तेलाच्या टँकरमधील कॉकचा पाइप फुटल्याने वाशीम शहरातील पाटणी चौक येथे खाद्य तेल पाण्यासारखे वाहत होते. वाहत असलेले तेल पाहून नागरिकांनी तेल जमा करून घरी नेण्यासाठी गर्दी केली. या घटनेमुळे संबंधित दुकान मालकाचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे.

खाद्यतेलाचा टँकर मशीनद्वारे रिकामा करण्याचे काम शहरातील दागडिया यांच्या दुकानासमोर सुरू होते. टँकर रिकामा करत असताना त्यातील कॉकचे पाईप अचानक फुटले. ही बाब लक्षात येताच मशीन बंद करेपर्यंत पाईपमधून जवळपास 600 लिटर खाद्यतेल रस्त्यावर सांडले. खाद्य तेल रस्त्यावर सांडल्यामुळे पाण्यासारखे वाहत होते. तेल वाहात असल्याचे दिसताच परिसरातील पुरुष, महिला आणि लहान मुलांनी ते जमा करण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठत वाहतूक सुरळीत केली. लिकेज झालेल्या पाईपमुळे दागडिया यांच्या खाद्य तेलाचे अंदाजे 60 हजार रूपयाचे नुकसान झाले.

edible oil tanker leaked on road at washim

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!