Nagpur | नागपूर : भारत नेहमी पॅलेस्टिनच्या बाजुने उभा राहिला आहे. हमासच्या बाजूने नाही, कारण हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. हमासने इस्त्राईलवर केलेला हल्ला योग्य नाही. गाझापट्टीत जे घडले त्याबद्दल भारताची भूमिका सुस्पष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणी हमास या दहशतवादी संघटनेचे समर्थन करीत असेल तर ते कदापी मान्य नाही असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे मुस्लिम समाजाची रॅली निघाली होती. त्याला पोलिसांनी प्रशासनाची परवानगी होती. रॅली जैन गल्लीतील बाजारपेठेत आल्यावर काही समाजकंटकांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत हमासचे झेंडेही दाखवले. त्यावेळी सर्व पोलिस अधिकारी तेथे हजर होते. विधिमंडळ अधिवेशनाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे 12 डिसेंबर रोजी आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत माहिती दिली. असे प्रकार थांबावेत तसेच तेथील पोलिस अधिकारी उद्धव धुमाळ यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार लाड यांनी केली. ( During The Rally Of Muslim Community At Dharangaon Of Jalgaon District Some Anti Social Elements Gave Slogans In Favour Of Hamas And Shown Flag Of Hamas MLC Prasad Lad Has Raised The Point In Vidhan Parishad And Demanded Action Against Such Activities And Responsible Police Officer)
आमदार लाड यांच्या माहितीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, जळगाव येथे जी घटना घडली त्याची वस्तुस्थिती तपासण्यात येईल. यात कुणी दोषी आढळल्यास त्याच्या विरोधात प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. प्रसंगी पोलिसांनाही कारवाईला सामोरे जावे लागले.