Home » दुबईमधील अल मिन्हाद जिल्हा आता ‘हिंद सिटी’

दुबईमधील अल मिन्हाद जिल्हा आता ‘हिंद सिटी’

by नवस्वराज
0 comment

दुबई : दुबईमधील अल मिन्हाद जिल्ह्याचे नाव बदलून ‘हिंद सिटी’ करण्यात आले आहे. अल मिन्हाद जिल्ह्य चार सेक्टरमध्ये पसरला आहे. यासर्व सेक्टरला अनुक्रमे हिंद १, हिंद २, हिंद ३ आणि हिंद ४ ही नावे देण्यात आली आहेत. हिंद सिटी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८३.९ किमी पर्यंत पसरले आहे.

शेख मोहम्मद बिन रशीद यांनी अल मिन्हाद जिल्ह्याचे नाव बदलण्याचे आदेश दिले आहेत. हे शहर अमिरात रोड, दुबई अल ऐन रोड आणि जेबेल अली लेहबाब रोड सारख्या प्रमुख महामार्गांनी जोडलेले आहे. जिल्ह्याचे नाव बदलणारे रशीद संयुक्त अरब अमीरातचे उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि सरंक्षण मंत्री यासोबतच ते राजे देखील आहेत. दुबईचे राजे शेख रशीद बिन ‘सईद’ अल मकतूम यांचे तिसरे पूत्र आहेत. २००६ पासून ते उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार पहात आहेत. हिंद हा शब्द अरेबिक भाषेत देखील आहे. त्याचा अरेबिक अर्थ होतो १० उंटांचा कळप असा आहे. अरबस्तानात हिंद असे मुलींचे नाव देखील आहे. शेख हिंद बिंत मकतूम बिन जुमा अल मकतूम हे शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांच्या बायकोचे नाव आहे.

 

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!