Home » साद माऊंटेनियर्स च्या गिर्यारोहकांचे दुहेरी यश

साद माऊंटेनियर्स च्या गिर्यारोहकांचे दुहेरी यश

by नवस्वराज
0 comment

अकोला : साद माऊंटेनियर्स मुंबई ही इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन नवी दिल्ली व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संलग्न गिर्यारोहण संस्था असून १९८६ पासून या क्षेत्रात कार्यरत आहे. संपूर्ण भारतात संघटनेचे ४५० हून अधिक सभासद आहेत.

साद माऊंटेनियर्स संस्थेने ११ ते २६ ऑगस्ट २०२३ दरम्यान संस्थेची ३२ वी गिर्यारोहण मोहीम लेह- लद्दाख भागातील मार्खा व्हॅली परिसरातील Mt. Dzo Jongo West ( 6280 M/ 20,724ft.) आणि Mt.Dzo Jongo East. (6,220mtr./20,526ft.) या दोन शिखरांवर आयोजित केली होती. चमूमधे सादचे आजीवन सदस्य अश्विन दाते अकोला, डॉ.रघुनाथ गोडबोले पुणे, प्रथमेश बाणखेले, अंजली किबे, सिध्दार्थ तसेच कृतीका असे एकूण ६ गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले होते. प्रथमेश आणि अश्विन यांनी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता Mt. Dzo Jongo West ( 6280 M/ 20,724ft.) हे शिखर आरोहण करून तेथे तिरंगा व साद संस्थेचा ध्वज फडकवला. डॉ. गोडबोले व अंजली किबे यांनी सकाळी ७ वाजता Mt. Dzo Jongo East. (6,220mtr./20,526ft.) या दुसऱ्या शिखरावर आरोहण करून दोन्ही ध्वज फडकवले.

दोन्ही चमून आपली कामगिरी चोखपणे बजावून ३२ वी गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पार पाडून सादच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

प्रथमेश आणि अश्विन Mt. Dzo Jongo West ( 6280 M/ 20,724ft.) हे शिखर सर करून खाली येत असतांना बाजूला असलेले रिजला शिखर Mt. Dzo Jongo East. (6,220mtr./20,526ft.) शिखर पादाक्रांत करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. दोन्ही साद विरांनी १० वाजता Mt. Dzo Jongo East समिट वर पोहोचले. तेथेही त्यांनी तिरंगा आणि सादचा ध्वज अभिमानाने फडकवला. एकाच दिवशी दोन हिमालयीन शिखरे सर करण्याचा अनोखा पराक्रम साद माऊंन्टेनिअर्स मुंबई च्या ३२ व्या शिखर मोहीमेत प्रथमेश आणि अश्विन यांच्या नावे कोरला गेला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अश्विन दाते हे अकोला जिल्हा माउंटेनियरिंग असोसिएशन चे पदाधिकारी आहेत.

मोहिम सुरळीतपणे पार पडावी म्हणून सिद्धार्थ आणि कृतिका यांनी बेसकॅम्प वरून सपोर्ट व्यवस्था चोखपणे सांभाळून मोहीम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. असे अजिंक्य फिटनेस पार्कचे संचालक धनंजय भगत यांनी ‘नवस्वराज’ ला कळवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!