Akola : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने ठरवून दिलेल्या टप्प्यानुसार 9 फेब्रुवार, शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अकोला परिमंडळ कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली. द्वारसभेत कंत्राटी कामगारांच्या समस्या तसेच विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संयुक्त कृती समितीच्या पुढील कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली.
द्वारसभेत अनिल मोहोरे राज्य सचिव महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, गणेश भंडारी अध्यक्ष नागपूर प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, विनोद फुलारी परिमंडळ सचिव अकोला महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, नरेंद्र औतकर अकोला मंडळ अध्यक्ष, गणेश घोपे कोषाध्यक्ष अकोला परिमंडळ , गणेश लहरीया विभाग सचिव अकोला ग्रामीण, यांनी मार्गदर्शन केले.
द्वारसभेला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश धारपावार, अनिल बोरसे जिल्हा सचिव, अब्दुल नईम अब्दुल कय्युम उपाध्यक्ष, संतोष तारापुरे संघटक, नितीन शर्मा प्रसिद्धी प्रमुख, सतीश मुराई, विजय कांबळे, दिनेश जटाले, गोपाल रायकवार, संजय गजबे, सज्जन शिरसे, संदीप मोकळकर, मोहम्मद इद्रीस शेख युनुस, संतराम यादव, आकाश राठोड, योगेश वानखडे, शुभम पांडे, आसिफ पटेल, रोशन गमे आदी कंत्राटी कामगार उपस्थित होते.