Home » अकोल्यात पत्नीचा मृतदेह नेताना डॉक्टर पतीला पकडले

अकोल्यात पत्नीचा मृतदेह नेताना डॉक्टर पतीला पकडले

by नवस्वराज
0 comment

अकोला : पत्नीचा मृतदेह नेताना डॉक्टर पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हा पती त्याच्या गाडीतून महिलेचा मृतदेह घेऊन जात होता. शवविच्छेदन अहवालानुसार, या महिलेचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. वर्षा राजेश ठाकरे (वय ३३, राहणार पातुर) हे मृतक महिलेचे नाव आहे. डॉक्टर राजेश ठाकरे हे तिच्या पतीचे नाव आहे.

हा प्रकार १६ सप्टेंबरला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडला. अकोला पोलिसांना माहिती मिळाली की एका चारचाकी वाहनातून महिलेचा मृतदेह नेऊन तिची विल्हेवाट लावल्या जात आहे. या माहितीनंतर चान्नी पोलिसांनी नाकाबंदी करून या संशयित वाहनाला थांबविले आणि वाहनाच्या तपासणी दरम्यान पत्नीचा मृतदेह वाहनातून संशयास्पद फिरविताना एक डॉक्टर पती पोलिसांना दिसून आला.

पत्नीची प्रकृती खराब आहे, हृदयविकारामुळे मृत्यू झालाय, गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी अनेक उत्तरे त्याने पोलिसांना दिली. लागलीच पोलिसांना त्याच्यावर संशय झाला, पतीच्या वाहनातूनच महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु इथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश महाजन, दत्ता हिंगणे यांनी सतर्कता दाखवून आलेगाव रस्त्यावर डॉक्टरच्या वाहनाचा पाठलाग केला आणि वाहन थांबवून डॉक्टर पतीकडे पोलिसांनी विचारपूस केली. त्यानंतर हत्येचा रचलेला कट समोर आला. वर्षा ठाकरे यांची हत्या पातुर शहरातील तिच्या राहत्या घरात झाली असल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पातुर पोलिसांत होणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!