Nagpur: राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थिर राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आमदार अपात्रेतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील. राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थिर राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis says at Nagpur government will be stable)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील 16 आमदारांचे राजकीय भवितव्य ठरवणारा हा निकाल आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेमध्ये फूट पडून झालेल्या सत्तांतरानंतर विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल बुधवारी (ता. 10) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाहीर करणार आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार तयार केले आहे.
आपल्याला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या निकालानंतर शंभर टक्के न्याय मिळणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थिर असून सरकार कालही स्थिर होते आणि उद्याही ते स्थिर राहणार आहे. निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होईल, त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही, असेही फडणवीस म्हणाले.