Home » विपश्यना साधनेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नागपुरात

विपश्यना साधनेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नागपुरात

by नवस्वराज
0 comment

नागपूर : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नागपुरात आले आहेत. पुढील 10 दिवस अरविंद केजरीवाल हे नागपुरात राहणार आहेत. नागपुरात अरविंद केजरीवाल हे ध्यान साधना विपश्यना शिबिरात सहभागी होणार आहेत. अरविंद केजरीवाल हे दरवर्षी ध्यान साधना विपश्यना शिबिरात सहभागी होतात. मागील वर्षी ते जयपूर येथील शिबिरात सहभागी झाले होते. पुढील आठ ते दहा दिवस ते फेटरी येथे विपश्यना शिबिरात भाग घेणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नागपूर सोबत अत्यंत जवळचा संबध आहे. आयएएस होण्यापूर्वी त्यांनी नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर प्रबोधिनी (नॅशनल डायरेक्ट टॅक्सेस) येथे प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांचा नागपुरातील नागरिकांशी जवळून संबंध आला आहे. असे असले तरी केजरीवाल यांच्या नागपूर दौऱ्याकडे राजकीय दृष्टीनेही पाहिले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथे मुख्यालय आहे. राज्यातील व केंद्रातील राजकारणाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून नागपूरकडे पाहिले जाते. नागपुरात लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुकाही होणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व केंद्रात वजन असलेले भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होम पीच म्हणून नागपूरकडे पाहिले जाते. अशाच नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने ही केजरीवाल यांचा नागपूर दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. विपश्यना साधनेदरम्यान केजरीवाल हे पूर्ण दहा दिवस मौन असतील. परंतु मौन साधनेतून बाहेर आल्यानंतर ते आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना काही संकेत देतात का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!